महाराष्ट्र

सोहळ्याचेउर्स पावित्र्य व भाविकांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य-

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- जरजरी बक्ष उर्स महोत्सवाच्या पावित्र्यास व येणाऱ्या भाविक, महिला यांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य देण्यात यावे, त्यादृष्टीने सर्व तपासण्या वेळीच पूर्ण कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधित यंत्रणाना दिले.

        हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर जरी बक्ष यांचा ७३९ वा उर्स महोत्सव दि.२९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यानखुलताबाद येथे होत आहे. या निमित्त प्रशासनामार्फत कराव्याच्या पूर्व तयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद येथे जाऊन आढावा घेतला.

         पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार स्वरूप कंकाळ, जिल्ह आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, नगरपालिका मुख्याधिकारी समीर शेख, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन प्रशांत अजिंठेकर, अग्निशमन अधिकारी विजय राठोड, उप कार्यकारी अभियंता यु. बी . खान, दर्गा कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद, शेख मुबशिरोद्दीन अमिरोद्दीन,मोहम्मद इम्रान मोहम्मद आबीद जहागिरदार, शेख युसुफोद्दीन चिरागोद्दीन तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

      बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, उर्स महोत्सवात येणारे भाविक, त्यातही महिला भाविक, लहान बालके यांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य द्यावे. यात्रेत विकले जाणारे खाद्य पदार्थ हे भेसळयुक्त नसावे यादृष्टीने अन्न, खाद्य पदार्थ नमुन्यांची तपासणी करण्यात यावी. तपासणी शिवाय खाद्य पदार्थ विक्री साठी ठेवता येणार नाही.तसेच गॅस सारख्या इंधनाची, पेट्रोल, डिझेल सारखे पदार्थ यांची साठवणूक व वाहतूक सुरक्षितता लक्षात घेऊन करावी. यात्रा परिसरात सिसिटीव्ही कॅमेराद्वारे निगराणी ठेवावी. गुप्तचर पोलीस, महिला पोलीस यांच्यासह दर्गा कमिटीचे स्वयंसेवक यांनी यात्रेत फिरून असामाजिक, संशयस्पद व्यक्तींवर नियंत्रण ठेवावे. कुणीही गैरकृत्य करतांना आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी. हरवलेली बालके, व्यक्ती यांच्या शोधासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष व उदघोषणा यंत्रणा कार्यान्वित करावी. एस.टी. बसेसची व्यवस्था, वाहनतळ, पर्यायी वाहतुक मार्ग आदींचे नियोजन करण्यात यावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

 सीसीटीव्ही यंत्रणा, पाणी पुरवठा व स्वच्छता व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, वीज वितरण व्यवस्था आदींची प्रत्यक्ष चाचणी घ्यावी. आरोग्य विभागाने एक पथक पूर्ण उत्सव कालावधीत कार्यान्वित ठेवावे, रुग्ण वाहिका सज्ज ठेवाव्या, यात्रेत लावण्यात येणाऱ्या रहाट पाळण्यांच्या मजबुतीची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत चाचणी करण्यात यावी,अशा सुचना त्यांनी दिल्या. दैनंदिन कचरा दररोज विल्हेवाट लावावी,असे निर्देश त्यांनी दिले.

       पोलीस अधीक्षक डॉ. राठोड म्हणाले की, पोलीस बंदोबस्त पुरेसा असेल. उर्स उत्सवात होणारी लोकांची गर्दी पाहता सुरक्षा उपायांची अंमलबजावणी केली जाईल. तसेच समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp