महाराष्ट्र

म्हारोळा गावात नागरिकांनी दुध प्राशन केल्याने ग्रामस्थातात भिंतीचे वातावरण

वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामसभा घेऊन केले शंकेचे निवारण 

A1 CID NEWS आवाज जनतेचा छत्रपती संभाजी नगर

म्हारोळा (ता पैठण ) या गावात काही दिवसांपूर्वी गाईच्या वासराला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीने वातावरण निर्माण झाले होते. गाईचे दूध पिणाऱ्या वासराचा मृत्यू झाला.या घटनेमुळे अनेकांनी दुधाच्या वापराबाबत शंका व्यक्त करून म्हारोळा गावातून ५०० हून अधिक लहान मोठ्या ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात जाऊन रेबिज लस घेतल्या. त्यांच्या शंकेचे निवारण करण्यासाठी स्थानिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित ग्रामसभेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली. दुधामार्फत रेबीज संसर्ग होत नाही. रेबीज हा एक गंभीर आजार आहे जो विषाणूमुळे होतो मानव तसेच प्राण्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. चावल्यामुळे किंवा ओरखडल्यामुळे हा आजार पसरतो. मात्र रेबीज ची लस, चावल्यानंतर किंवा संसर्गाच्या संपर्कात आल्यावर घेणे अत्यंत गरजेचे असते. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये दुधातून रेबिज संसर्ग होत नाही असे सविस्तर मार्गदर्शन केले त्यामुळे भयभीत झालेल्या गावकऱ्यांना दिलासा मिळाला यावेळी निलजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील श्री.डॉ.किशोर जाधव वै. अधिकारी प्रा.आ.केंद्र निलजगांव,अनुप खडसे समुदाय अधिकारी,सुनील जाधव आरोग्य पर्यवेक्षक,विजय गवई आरोग्य सेवक,वसुधा चित्ते आरोग्य सेविका,शीतल बारहाते आशा,सुशीला मंडलिक आशा कार्यकर्ती. उपस्थित होते डॉक्टरांनी कुत्रा चावल्यास घ्यावयाची काळजी, लसीकरणाची गरज याबाबतही मार्गदर्शन केले.उपस्तीत गावकऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना अनेक शंका उपस्थित केल्या असून त्यांच्या शंकेचे समाधानकारक उत्तर देण्यात आले. या प्रसंगी म्हारोळा गावचे उपसरपंच रंगनाथ जिजा जाधव ग्रा.प सदस्य, आशा कार्यकर्ती अंगणवाडी सेविका व मदतनीस व गावकरी उपस्थित होते यादरम्यान म्हारोळा येथे पैठण व चितेगाव पशुवैद्यकीय अधिकारी यांनी गावातील पाळीव जनावरांचे लसीकरण केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp