ए वन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजी नगर.वाळूज MIDC पोलीस ठाणे हद्दीत एकलहरा रोडच्या कडेला अर्जुन रतन प्रधान वय 28 वर्ष राहाणारा आंबेलोहळ तालुका गंगापूर या तरुणांचा 12 जुलै रोजी सकाळी अंशतः नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.या घटनेची MIDC पोलीसांना खबर मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांची पाहणी केली असता त्यांना घटनास्थळी अर्जुन प्रधान यांचा अतिशय क्रूर पने मारहाण करून खून केल्याचे दिसून आले.खून कोणी व कशासाठी केला त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला असता अवघ्या काही तासांतच आरोपींचा शोध घेऊन पोलीसांनी त्यांना जरबेरा केले.आई सोबत झालेल्या वादातून आरोपी पांडुरंग वामन प्रधान यांने मनात सुडाचा राग धरून मित्राच्या साह्याने खून केल्याचे कबूल केले विठ्ठल नामदेव प्रधान,नीलेश मच्छिंद्र प्रधान,अंकुश दिलीप प्रधान, नंदकुमार दादासाहेब बोऱ्हाडे राहाणारा आंबेलोहळ ता गंगापूर अशी पाच आरोपींची नावे असून यांनी अर्जुन याला लाथा बुक्याने व कंबरेचा बेल्ट,लाकडी काड्या,केबलणे जबर मारहाण करुन जिवे मारले असून वाळूज midc पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वाळूज MIDC पोलीस करत आहे




