महाराष्ट्र

शेवगावचे भुमी पुत्र राहुल फसले यांची आर.टी.ओ. पदी निवड 

मधुकर केदार अहमदनगर.शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील रहिवासी असलेले राहुल बाळासाहेब फसले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी निवड झाली आहे. शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव शे येथील रहिवासी असलेले राहुल फसले यांनी प्राथमिक शिक्षण ढोरजळगाव येथे तर जिजामाता महाविद्यालय भेंडा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. १२ वी नंतर पुणे येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. दोन परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेनंतर मुलाखत दिल्यानंतर त्यांना अपयश आले. परंतु खचून न जाता जिद्दीने अभ्यास करीत त्यांची मागील वर्षी सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय पदी त्यांची निवड झाली होती. सध्या ते मंत्रालय मुंबई येथ े कार्यरत आहेत. २०२३ च्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राहुल यांची सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ( वर्ग – १) पदी निवड झाली आहे. निवडी बद्दल ढोरजळगाव येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. राहुल हे जिजामाता महाविद्यालयाच े ग्रंथपाल बाळासाहेब फसले यांचे चिरंजीव आहेत. राहुल यांच्या निवडीबद्दल त्यांचे मा.आ. नरेंद्र घुले, मा.आ. चंद्रशेखर घुले, आ. मोनिका राजळे, खा. निलेश लंके, प्रतापराव ढाकणे, हर्षदाताई काकडे,बापूसाहेब पाटेकर, डॉ. सुधाकर लांडे, राजेंद्र देशमुख, डॉ. नामदेव दौंड, संभाजी लांडे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp