महाराष्ट्र

खुलताबाद पोलीसाची धडाकेबाज कामगिरी एम डी ड्रग्स विक्रेत्याला केले जेरबंद

छत्रपती संभाजी नगर खुलताबाद हद्दीत अंमली पदार्थ ड्रग्स व गुगीकार अवैधे विक्री करणाऱ्यांवर खुलताबाद पोलीसांनी कारवाई केली असून गुलाब शाह कॉलनी येथील सय्यद बिलाल उर्फ इकबाल सय्यद खलील हा एम डी ड्रग्स विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच खुलताबाद पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने एन डी पी एस कायद्या अंतर्गत छापा टाकून नमूद आरोपीचे कब्जातून 11,40 ग्राम (एम डी ) ड्रग 68,420 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वेरूळ येथील पार्श्वनाथ मेडिकल स्टोअर्स चे चालक हे डॉक्टरांच्या लेखी सुचना विना गुगीकारक औषधे विक्री करत असल्याने मेडिकल वर छापा टाकून त्याचे कब्जातून एकूण 46 अल्प्राझोलं टॅब्लेट जप्त करून दोन्ही आरोपी विरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने ड्रग्स विक्रेत्या आरोपीला चार जून पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला असून सदर कामगीरी PI धनंजय फराटे, API दिनकर गोरे, पोलीस हवालदार जाकीर शेख, पोलीस हवालदार गवळी, अंकुश सरोदे, सिद्धार्थ सदावर्ते खुलताबाद पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली आहे.अधिक तपास PI फराटे हे करीत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp