महाराष्ट्र

ढाकेफळ येथे १६ वर्षिय मुलांचा शॉक लागून मृत्यू

छत्रपती संभाजी नगर.पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे आपल्या राहत्या घरी नविन बांधकामावर १९ एप्रिल शनिवार रोजी सकाळी पाणी मारत असताना अचानक विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने साबेर शाकेर शेख वय १६ रा. ढाकेफळ या अल्पवयीन मुलास विजेचा जोराचा शॉक लागल्याने तो जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली आहे.नातेवाईकांनी तात्काळ ढाकेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मिन शहा यांनी तपासून पुढील उपचारासाठी बिडकीन रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.नातेवाईकांनी या मुलाला बिडकीन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु तोवर त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.या घटनेने गावात शोककळा पसरली असून सर्व गावकरी हळहळ व्यक्त करत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp