पैठण तालुक्यातील लाखेगाव येथे निवृत्त पोलीस पाटलावर कोयत्याने वार
तिन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

क्राइम न्यूज. छत्रपती संभाजी नगर बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत मौजे लाखेगाव येथे निवृत्त पोलीस पाटील भगवान श्रीपतराव कागदे यांच्यावर १६ मार्च रविवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घराकडे मोटारसायकल वरून जात असताना गावात शब्बीर शेख यांच्या घरासमोर काही गावगुंडाने अडवून लाठ्या काठ्या व कोयत्याने हल्ला चढवला. फिर्यादी सेवा निवृत्त पोलीस पाटील भगवान श्रीपतराव कागदे वय ६० वर्ष रा.लाखेगाव ता. पैठण हे गावांमध्ये येत असताना आरोपी अशोक रामनाथ कागदे,तेजस अशोक कागदे, शैलेश अशोक कागदे,सर्व रा.लाखेगाव यांनी काही वादातून मनामध्ये रांग धरून अचानक भगवान कागदे यांच्यावर जिव घेने वार केले.जिवे मारण्याच्या उद्देशाने लाठ्या काठ्यांनी व धारदार शस्त्राने हल्ला चढवला भगवान कागदे यांच्या डोक्यात लोखंडी कोयता घातल्याने भगवान कागदे गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत बिडकीन पोलीस ठाण्यात आणले असता सदरील घटनेची नोंद घेऊन प्राथमिक उपचारासाठी बिडकीन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तदनंतर येथील प्राथमिक उपचारानंतर डोक्याला गंभीर रित्या मार लागल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे .आरोपी यांनी फिर्यादीस मारहाण शिविगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या .सदर घटनेबाबत आरोपी विरोधात बिडकीन पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.