पैठण येथे चोरट्याने होलसेल किराणा व्यापाऱ्याला दहा लाखांला लूटले
शहरात व्यापारी वर्गात खळबळ

क्राइम न्यूज: पैठण.होलसेल किराणा दुकान व्यापाऱ्याला अडवून चोरट्यांनी आठ ते दहा लाख रुपये रक्कमेची फिल्मी स्टाईलने व्यापाऱ्यांची केली लुट ही घटना पैठण शहरात घडली आहे.२० मार्च रोजी पारंपरिक नाथषष्ठी उत्सवाला सुरुवात होत असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.शहरातील भवानीनगर परिसरात गुरुवारी १३ मार्च रोजी रात्री ८:३० च्या सुमारास ही घटना घडली.या घटनेमुळे व्यापारी वर्गात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रेच्या निमित्ताने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस निरीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी १३ मार्च रोजी दिंडी मार्ग व यात्रा उत्सव परीसरात अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पैठण शहराच्या चहु बाजू मार्गाची पाहणी केली.असे असले तरी चोरट्यानी व्यापाऱ्याला लुटून पोलीसांना एकप्रकारे सतर्कतेचा इशाराच दिला असल्याचे दिसून येत आहे.पंकज ट्रेडर्स होलसेल किराणा दुकानांचे व्यापारी राजेंद्र सारडा वय ६२ हे दुकान बंद करून गुरुवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास स्कुटी मोटारसायकलने घरी जात असताना.आठ ते दहा लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग त्यांच्यासोबत होती. भवानीनगर परिसरातील शमी गणपती मंदिराजवळ आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी सारडा यांची स्कूटी अडवून यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकून. पैशांची बॅग हिसकावून घेऊन पसार झाले.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी शहरात नाकेबंदी करून. लूटारुचा शोध घेण्यासाठी पाच पोलीस पथके तयार करण्यात आले आहे.