बारामती तालुक्यातील मेंढपाळ कुटुंबावर मध्यरात्री लोहगाव शिवारात चोरट्यांचा हल्ला
या हल्ल्यात एकूण सात जण जखमी

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यांतील घटना बारामती तालुक्यातील चार मेंढपाळ कुटुंब पैठण लोहगाव शिवारात एका शेतात मुक्कामी थांबले असताना गुरूवार ६.मार्च मध्यरात्री चोरट्यांनी त्याच्यावर जिव घेना हल्ला चढवला सहा पुरूष व दोन महिलांना लाकडी दाडे व कुर्हाडीने जोरदार मारहाण केली.यात दोन जण गंभीर जखमी झाले असुन चोरट्यांनी महीलाच्या अंगावरचे सोने, चांदी,व रोख रक्कम ओरबाडून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस अधिकारी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.याबाबत अधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील मुढाळ गावातील चार मेंढपाळ कुटुंबे टाकळी पैठण येथुन लोहगाव ते दिन्नापूर रोडवरील अजय दसपुते यांच्या गट नंबर ५८ मधील शेतात मेंढ्यांचा कळपासह राहूटी करून थांबलेले होते.त्यांच्या राहूटी वर ६ मार्च गुरुवार रोजी मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने दरोडा टाकला झोपलेल्या मेंढपाळावर अचानक हल्ला करून लाकडी दांडे, कुर्हाडीने जोरदार मारहाण केली .महिला व लहान मुलांच्या अंगावरील पाच ते सात तोळे सोने चांदीचे डांग दागिने रोख रक्कम ओरबाडून चोरटे पसार झाल्याची घटना घडली.या घटनेत महीला व लहान मुलांनाही मारहाण झाली असून पुरुषा सह एकूण सात जण जखमी झाले आहे. दोघे गंभिर जखमी झाले आहेत जखमींना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून.मेढपाळावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी पुजा नांगरे,सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके सहायक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनिल खरात, संतोष पाटील, गोपाल पाटील, विठ्ठल डोखे, संतोष डमाळ, संतोष तोडकर, सोमनाथ तांगडे, यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी, व पंचनामा करून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली.