Uncategorized

चावी बनवून देण्याचा बहाणा करुन सोन्याच्या दागिन्यांची चोरी परराज्यातील सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांची कार्यवाही

छत्रपती संभाजी नगर पोलीस ठाणे करमाड हद्दीत प्रॉपर करमाड गावात दिनांक १७, फेब्रुवारी रोजी दुपारी दोन इसमानी घरातील कपाटाची चावी बनवून देण्याचा बहाणा करत फिर्यादीच्या घरात गेले व चावी बनवण्यासाठी तेल द्या असे सांगून फिर्यादी तेल आणण्यासाठी जाताच कपाटातील २३, ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. फिर्यादी नामे अल्ताब इब्राहिम शेख वय ३४, वर्ष रा. करमाड याच्या फिर्यादी वरून,करमाड पोलीस ठाणे येथे गुन्हयांचे अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या CCTV फुटेज च्या आधारे गुन्हा केलेले परराज्यातील दोन इसम यांची गोपनीय बातमीदारा मार्फत ओळख पटवण्यात आली होती,२६, फेब्रुवारी रोजी गुप्त माहिती मिळाली की गुन्हा केलेला ईसम नामे जगदीशसिंग हा गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी चौकबजार सुरत येथे येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या परवानगीने तपास पथक गुजरात राज्यात तपासकमी रवाना झाले व चौक बाजार, सुरत येथे सापळा रचला, CCTV फुटेज आधारे निष्पन्न केलेला इसम सदर ठिकाणी आला असता तपास पथकाने त्यास ताब्यात घेतले असता तो जगदीशसिंग विक्रमसिंग खिची रा. अमरोली, सुरत, राज्य गुजरात असल्याचे निष्पन्न झाले, त्यास चौकशी कामी ताब्यात घेतले व त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्या बाबत व मुद्देमाला बाबत विचारपूस करता त्याने त्याचा दुसरा साथीदार व नातेवाईक नामे राजबिरसिंग जागरसिंग पटवा रा. ओझर ता. सेंधवा जिल्हा बडवणी राज्य मध्यप्रदेश याच्यासह केल्याची कबुली दिली सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यात विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने सदर गुन्ह्यात चोरलेला एकुण ६६०००, रुपयेचा मुद्देमाल किमंतीचे सोन्याचे दागिने सह त्यास ताब्यात घेतले असून. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक.डॉ.विनयकुमार राठोड. अपर पोलीस अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सहा. पो.निरीक्षक पवन इंगळे, पोह/नामदेव शिरसाठ, पोह/विठ्ठल डोके, पोह/वाल्मिक निकम, पोह/ शिवानंद बनगे, पोना/अशोक वाघ, चापोअं/संतोष डमाळे यांनी केली आहे. अधिक तपास करमाड पोलीस करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button