New Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीत भयंकर प्रकार, चोरांनी गर्दीत चाकू-ब्लेड फिरवले अन् अनर्थाला झाला प्रारंभ

New Delhi Railway Station Stampede: दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर (New Delhi Railway Station Stampede) झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घटली.
दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आले होते. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर काल रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.
रेल्वे स्थानकावर अचानक प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे लोक एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर धावले. तसेच मोठ्या संख्येने लोकांकडे जनरल तिकिटे होती.