खुलताबाद शहरात हत्यार बाळगणाऱ्या पाच तरुणांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद जेलबद
छत्रपती संभाजी नगर.ए वन सी आय डी न्यूज खुलताबाद शहरात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांची धडाकेबाज कामगिरी. पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार खुलताबाद येथे काही तरुण हे त्यांचे जवळ अवैध शस्त्र बाळगून आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस पथकाने 10 जुलै रोजी सापळा रचून त्यांचा शोध घेतला असताना त्यांना खुलताबाद हद्दीत प्रॉपर खुलताबाद फाटा येथे अवैध शस्त्र बाळगणारे पाच आरोपी मिळून आले पोलीसांनी त्यांना विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता.त्यांचे जवळ घातक शस्त्र मिळाले.1) अजमत खाण अजिस खाण वय 25 वर्ष रा. खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर याचे ताब्यात शस्त्र गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुस किमंत = 36000 रू व मो हॅन्डसेट 15000 रू असा एकूण 51000 चा मुद्देमाल मिळून आला . 2) फैजान शहा अब्दुल शहा वय 26 वर्ष रा. खुलताबाद याचे ताब्यात एक धारदार तलवार किमंत 3000/ रू , एक धारदार कोयता किमंत 1000 / रू व एक मोबाईल हॅन्डसेट किमंत 15000 / रू चा असा एकूण 19000 / रू चा मुद्देमाल मिळून आला . 3 ) मोहंम्मद मुजाहीद निसार कुरेशी वय 24 वर्ष रा. खुलताबाद जि . छत्रपती संभाजीनगर याचे ताब्यात एक धारदार तलवार किमंत 3000/ रू ची व एक मोबाईल हॅन्डसेट किमंत 10,000/ रू असा एकूण मुद्देमाल 13000 / रू चा मुद्देमाल मिळून आला. 4) फलक शहा नासीर शहा वय 22 वर्ष रा. खुलताबाद जि . छत्रपती संभाजीनगर याचे ताब्यात एक धारदार तलवार किमंत 3000/ रू व एक मोबाईल हॅन्डसेट किमंत 10,000 / रू असा एकूण 13000/ रू चा मुद्देमाल मिळून आला . 5) मोहंम्मद अल्तमश मोहम्मद फईम वय 25 वर्ष रा. खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर याचे ताब्यात एक धारदार तलवार किमंत 3000 / रू ची व एक मोबाईल हॅन्डसेट 10,000 / रू असा एकूण 13000 / रू चा मुद्देमाल मिळून आला. पाचही आरोपी कडे एकूण मुद्देमाल 109000/ रूपये किमतीचा विना परवाना बेकायदेशिर रित्या सदरचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस , 04 धारदार तलवारी व 01 धारदार कोयता त्यांचे ताब्यात व कबज्यात बाळगतांना 05 इसम मिळुन आल्याने. त्याचा रितसर पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून त्यांचे विरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात वेगवेगळे कलमा अंतर्गत भारतीय हत्यार कायदा महाराष्ट्र पोलीस कायद्या प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदर कामगीरी माननीय पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दिपक पारधे , पोहेका/श्रीमंत भालेराव , कासिम पटेल ,प्रमोद पाटील , सचिन राठोड , पोअं / शिवाजी मगर यांनी केले आहे




