थापटीतांड शिवारात कुलस्वामिनी कला केंद्रावर पोलीसाची कारवाई

छत्रपती संभाजी नगर. A1 CID NEWS आवाज जनतेचा पैठण तालुक्यातील थापटीताडा कला केंद्रावर सहा जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे स.पो.नि. सरला गाडेकर यांनी पथकासह कुलस्वामीनी कला केंद्राच्या परिसरात सापळा लावून अचानकपणे कला केंद्रावर छापा टाकला असता तेथे नऊ खोल्या मध्ये तेथील महिला पुरुष ग्राहकासोबत साऊंड सिस्टिमच्या साहय्याने नाचगाणे करत असताना मिळून आल्या कलाकेंद्राचे व्यवस्थापक/चालक अनंत विठ्ठल माने यांचेकडे कलाकेंद्राच्या/नृत्याच्या कागदपत्राची परवाण्याबाबत मागणी केली असता त्यांच्याकडे कोणताच परवाना आढळून आला नाही. तरी देखील सदरचे कलाकेंद्र चालक हे कायदेशिर असल्याचे सांगत होते.कलाकेंद्र चालक यांने त्याचेकडील कलाकेंद्र चालविण्यासंदर्भात दस्ताऐवज ८ जुलै रोजी तपास अधिकारी यांना सादर केले.त्या अनुषंगाने परवाना तसेच इतर कागदपत्राची पडताळणी केली असता त्यामध्ये कुलस्वामिनी कलाकेंद्र चालविणे बाबत त्याचेकडे अधिकृत रीतसर असा कोणताही/परवाना नसल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. परवाना नसतांना कलाकेंद्रात साऊंड सिस्टिम लावून महिलांसोचत काही लोकं नृत्य,नाचगाणे करतांना आढळून आल्याने कुलस्वामिनी कलाकेंद्राचे चालक व मालक अनंत विठ्ठल माने चय ४५ वर्षे रा. चापणी ता. मोहोळ जि. सोलापुर,संगीता बदाम मुसळे वय ३७ वर्षे रा. वाफळे ता. माढा जि. सोलापुर,दादाराव बदाम मुसळे वय ४० वर्षे रा. वाफळे ता. माढा जि. सोलापुर, हल्ली मुक्काम कुलस्वामीनी कलाकेंद्र गट नंबर १६, थापटीतांडा शिवार, ता. पैठण यांच्या विरुध्द पोलीस ठाणे पाचोड येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




