पैठण रोडवर माजी महापौर यांच्या हॉटेलवर फिरला बुलडोझर

ए वन सी आय डी न्यूज , छत्रपती संभाजी नगर जालना रोडचे अतिक्रमण हटवल्यानतर पैठण रोडकडे महापालिकेने मोर्चा वळवला आहे ६० मीटर रूंद करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सोमवारी ३० जून सकाळी ११ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत ४७७ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. कारवाईत महापालिकेचे ३००, पोलिसांचे २०० अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.जालना रोडने मोकळा श्वास घेतल्यानंतर आता पैठण रोडकडे महापालिकेने मोर्चा वळवला आहे.पाच पथके प्रत्येक ५००, मीटर अंतरावर तैनात करून कारवाईला सुरुवात करण्यात आली.पैठण कडे जाताना उजव्या बाजूची अतिक्रमणे हटविण्यात येत असून. या कारवाईत माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हॉटेलवर पडला. हॉटेलच्या दर्शनी भागावर जेसीबी चालवून हॉटेल पाडण्यात आले.बाजूला असलेले महानुभाव आश्रम यांनी स्वतःहून आपले बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केली. बांधकाम परवानगी असलेल्या उद्योजकांना १५ ऑगस्ट पर्यत मुदत देण्यात आली असून. कांचनवाडी व नक्षत्रवाडीत सर्वाधिक अतिक्रमणे होती, ती बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात येत असून. वॉशिंग सेंटर,ओटे गॅरेज,लॉजग, दुकाने, शेड, कंपाऊंड, मेडिकल, जड्रल स्टोअर, काढण्यात आली.काही राहत्या घरांवर बुलडोझर चालताच.नागरिकांनी आक्रोश व महिलांची रडारड यावेळी दिसून आली.रक्ताच पाणी करून कष्टाने कमावलेला संसार धुळीस मिळत असताना पाहिल्यावर रुदयाल किती वेदना सहन कराव्या लागत असतील याची कल्पनाच करवत नाही. संसार उपयोगी वस्तू पडझडी दरम्यान हलविण्यासाठी पळापळ करणारे कुटुंब पाहून काळीज हेलावत होते. यावेळी १० जेसीबी, ४ पोकलेन, १५ टिप्पर, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने, २ अग्निशमन बंब, ४ इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहनांचा पैठण रोड कारवाईत समावेश होता
.




