चक्री चा चक्कर अर्ध्यावरच निवडक ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर कारवाई

A1 CID NEWS आवाज जनतेचा छत्रपती संभाजी नगर.
पैठण तालुक्यातील बिडकिन पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री (बिंगो) जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली असली, तरी राजकीय पुढाऱ्यांच्या पाठबळाने चालणाऱ्या अड्ड्यांना मात्र अभय असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. चितेगाव येथे १४.जुलै रोजी पोलिसांनी तिन ठिकाणी छापा टाकून काही चक्री जुगार चालकावर कारवाई केली.परंतु बिडकिन व फारोळा येथे राजकीय नेत्यांच्या आश्रयाने चालणाऱ्या चक्री अड्ड्यांवर कारवाई न होणे हे संशयास्पद मानले जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिडकिन पोलीस ठाणे हद्दीत सूरु असलेले अवैध धंदे,ऑनलाईन चक्री जुगार,मटका,आणि इतर गोरखधंद्यांमागे काहींचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने ते त्यांच्या रडारवर नसल्याचे चित्र चितेगाव येथील कारवाई दरम्यान दिसून आले.कायद्याची अंमलबजावणी निवडक पद्धतीने केली जात असल्याचा आरोप नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी खरोखरच अवैध धंदे व चक्री जुगार विरोधात मोहिम सुरू केली असेल, तर ती १००% सर्वांना समान लागू व्हायला हवी होती.असे न करता काही चक्री जुगार अड्ड्यांना फाटा फोडून केवळ ठराविक चक्री चालकावर कारवाई करणे कितपत योग्य आहे. ऑनलाईन चक्री जुगार मुळे अनेक गेरगरीब कष्टकरी कामगार सर्वसामन्याचे संसार उद्धवस्त होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे पोलीसांनी केलेल्या कारवाईत आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र अनेक अवैध धंदे बिनधास्त सुरू असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई होणार का असा प्रश्न निर्माण होत आ
हे.




