महाराष्ट्र

बेफाम वाहन चालकाने काळा गणपती दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दिली धडक

छत्रपती संभाजी नगर .चार जुलै रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे MIDC सिडको छत्रपती संभाजीनगर हद्दीतील काळा गणपती मंदिरासमोर चालक प्रशांत एकनाथ मगर, वय 30 वर्ष, रा. सिडको छत्रपती संभाजी नगर हा क्रीडा संकुल स्टेडियम गारखेडा येथून टेनिस खेळून MH-20-HH-0746 या स्विफ्ट डिझायर कारने घरी जात होता यादरम्यान काळा गणपती मंदिरा समोर टर्न घेऊन सिप्ट वाहन चालकाने बेजबाबदार निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना व लोकांना जोराची धडक दिली हा अपघात भयानक स्वरूपाचा झाला असून वाहन चालकचा सर्व प्रकार मंदिरातील CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून या धडकेत काळा गणपती मंदिराचे सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे, वय 70 वर्ष यांचा मृत्यू झाला. इतर 4 जन गंभीर जखमी झाले असून, मनीषा विकास समधाने, वय 40 वर्ष, विकास समधाने, वय 50 वर्ष, रवींद्र भगवंतराव चौबे, वय 65 वर्षे, श्रीकांत प्रभाकर राडेकर, वय 60 वर्ष असे जखमीची नावे असून त्यांना उपचारासाठी शासकीय व प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.कार चालकास सिडको MIDC पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp