महाराष्ट्र

धक्कादायक घटना प्रसिद्ध महीला कीर्तनकार संगीताताई महाराज यांची दगडाने ठेचून हत्या

वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील घटना

छत्रपती संभाजी नगर.वैजापूर विरगाव पोलीस ठाणे हद्दीतील घटना प्रसिद्ध कीर्तनकार ब्रह्मचारी संगिताताई महाराज अण्णासाहेब पवार वय ४८, रा. चिंचडगाव, यांची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना २८ जून शनिवार रोजी पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. संगीताताई महाराज यांचे चिंचडगाव गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आश्रम आहे या आश्रमात घुसून त्यांची हत्या करण्यात आल्याने तालुक्यात सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे या आश्रमात मोहटा देवीचे मंदिर आहे मंदिराजवळच दोनशे मीटर अंतरावर त्यांची खोली आहे. नेहमीप्रमाणे पहाटे सहाच्या दरम्यान ग्रामस्थ मंदिरात आरतीसाठी आले.त्यानी संगीताताई महाराज यांना आरतीसाठी आवाज दिला त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खोलीकडे जाऊन खोलीत डोकावून पाहिले असता त्यांना संगीताताईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ विरगाव पोलिसांना खबर दिली पोलीसांना खबर मिळताच पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता.त्यांना घटनास्थळी संगीताताई महाराज यांचे दगडाने डोके ठेचून हत्या झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते मात्र श्वानपथकाला फारसे यश आलेले नाही.दरम्यान, ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली की आणखी कोणत्या उद्देशाने करण्यात आली यांचे कारण अद्याप समोर आलेले नाही.मात्र मारेकऱ्यांनी हत्या केल्यानंतर मंदिराची दानपेटी फोडून त्यातील रक्कम नेल्याचे दिसून आले आहे. 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp