वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक
स्मारक उभारणीसाठी शासनाची २५ कोटींची तरतूद

ए वन सी आय डी न्यूज छत्रपती संभाजी नगर.मराठी साहित्यिक समाजसुधारक आणि लोककवी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मुळ गावी सांगली जिल्ह्यात वाटेगाव ता. वाळवा येथे त्यांच्या जन्म भूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या स्मारकासाठी शासनाच्या वतीने २५ कोटी रुपये चा निधी तरतूद करण्यात आला आहे.वाळवा येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा १५ दिवसांत शासन स्तरावर हस्तांतरित करणार असल्याचे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.पाणीपुरवठा विभागाच्या मालकीची १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अधिकाऱ्यासमवेत आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली आहे स्मारक उभारणीमुळे अण्णा भाऊ साठे यांचे उल्लेखनीय कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणादायक ठरेल त्यांच्या कार्याची गाथा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा उजाळा देत म्हटले आहे.खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख,आमदार सदाभाऊ खोत,आमदार डॉ.अशोकराव माने, जिल्हाधिकारी अशोक काकडे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यावेळी उपस्थित होते