महाराष्ट्र

सिडको पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी 35 मोबाईल हस्तगत करुन मोबाईल धारकांना परत

6 लाख 90 हजार रुपये किमतीचे एकुण 35 मोबाईल

छत्रपती संभाजी नगर.सिडको पोलीस स्टेशन हद्दीत विवीध ठिकाणावरुन रिक्षा, बस मध्ये राहुन गेलेले, हरविलेले तसेच चोरी गेलेले असे विवीध कंपनीचे मोबाईल बाबत पोलीस स्टेशन सिडको येथे विवीध दाखल तक्रारी वरून मोबाईलचा शोध घेऊन अधिकारी व अंमलदार यांनी तंत्रज्ञानची मदतीच्या साह्याने प्राप्त माहिती व तांत्रीक तपास करुन.

एकुण 6,90,000/- रुपये किमतीचे विवीध कंपनीच्या एकुण 35 मोबाईल ताब्यात घेतल्या नंतर त्यांचे विस्लेशन करुन नमुद मोबाईल वापरकर्ते यांचे नाव पत्ते प्राप्त करण्यात आले. त्या नंतर पोलीस स्टेशनचे विशेष पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळ्या गावी जाऊन मोबाईल व मोबाईलचे वापरकर्ते यांचा शोध घेऊन नमुद मोबाईल पैकी बहुतांश मोबाईल स्थानिक छ. संभाजीनगर जिल्हा, जालना, बीड, बुलढाणा परिसरातुन परत मिळविण्यात आले आहेत. तर 3-4 मोबाईल हे परराज्यातून मिळविण्यात आले आहे. असे विवीध ठिकाणाहुन एकुण 35 विवीध कंपन्याचे व किमतीचे मोबाईल हस्तगत करुन पोलीस ठाणे सिडको विशेष पथकाने चोरीस गेलेले, हरविलेले, रिक्षात, बस मध्ये राहून गेलेल असे मोबाईल 

मुळ मोबाईल धारकांना परत करण्यात आले.यावेळी एक जेष्ठ नागरीक जितेंद्र प्रभाकर वैद्य वय 78 वर्ष रा. एन 12, सिडको छत्रपती संभाजीनगर यांना त्यांचा मोबाईल परत मिळवून दिल्याने त्यांना अतिशय आनंद व्यक्त करुन त्यांनी सिडको पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आभार व्यक्त केले.

मोबाईल हस्तगत कामगीरी पोलीस अधिकारी व अंमलदार

प्रविण पवार, पोलीस आयुक्त, प्रशांत स्वामी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2.सुदर्शन पाटील, सहायक पोलीस आयुक्त, सिडको विभाग,यांचे मार्गदर्शनाखाली सोमनाथ जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पो.ठाणे सिडको, छत्रपती संभाजीनगर,

 सफौ / सुभाष शेवाळे, पोह/मंगेश पवार, पोह/प्रदिप दंडवते, पोअं/विशाल सोनवणे, पोअं/सहदेव साबळे पोअं/प्रदीप फरकाडे, पोअं/ अमोल अंभोर पो. ठाणे सिडको, छत्रपती संभाजीनगर यांनी केलीआहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp