महाराष्ट्र

गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत गावठी गट्टा व जिवंत काडतुस बाळगणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

छत्रपती संभाजीनगर गंगापूर ग्रामीण पोलीसांची कार्यवाही 

दिनांक 01/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन गंगापुर हद्दीत मौजे जामगाव येथे एक ईसम एक गावठी पिस्टल (अग्निशश्त्र) व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी घेवुन येणार आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाली.त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. सतिष वाघ यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि पवन इंगळे सोबत त्यांचे पथक सदर ठिकाणी छापा टाकण्याची योजना आखली व मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सापळा रचुन कायगाव ते गंगापुर जाणारे रोडवर जामगाव फाटा येथे सापळा रचुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव किरण जाधव रा. जिकठाणा ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. नमुद इसमांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी कट्टा व त्यात दोन जिवंत काडतूस मिळून आल्याने पंचासमक्ष ते जप्त करण्यांत आले.असून आरोर्पीच्या विरुध्द सरकार तर्फे फिर्यादी वाल्मीक दौलतराव निकम पोलीस हवालदार ने. स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे तक्रारीवरुन पोलीस ठाणे गंगापुर येथे कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे गंगापुर हे करीत आहे.सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सपोनि पवन इंगळे, पोउपनि दिपक पारधे, पोह/वाल्मीक निकम, पोह/ सुनिल खरात, पोह/ विठ्ठल डोके, पोह/गोपाल पाटील, पोह/शिवानंद बनगे, पोअं/संजय तांदळे, पोअं. राहुल गायकवाड, पोअं. / योगेश तरमाळे, पोअं./जिवन घोलप यांनी केली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे गंगापुर हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp