कन्नड शहर पोलीसाची धडाकेबाज कामगिरी १ कोटी २२ लाख ७० हजार किंमतीचा गांजा केला जप्त

छत्रपती संभाजी नगर.कन्नड शहर पोलीसांनी धडाकेबाज कामगिरी केली असून त्यांच्या धाडसी कामगिरीची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे.दिनांक ०१/०५/२०२५ रोजी गुप्त खबऱ्याकडून कन्नड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी यांना दाभाडी शिवारातील शेतगट नंबर ८२ मधील नशीबखाँ सांडेखाँ पठाण यांच्या मालकीच्या शेतातील घरात अंमली पदार्थ गांजा तस्करी करीता साठवून ठेवलेला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदर कारवाईच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड व पोलीस निरीक्षक श्री आर.बी. सानप यांनी पोलीस पथकासह सापळा रचून, शासकीय पंच, वजनकाटा मोजमाप करणारे सह इसम नामे नशीबखाँ सांडेखाँ पठाण रा. कुंजखेडा ता. कन्नड याचे दाभाडी शिवारातील शेत गट नंबर ८२ मधील शेतातील घरावर धाड टाकून, सदर ठिकाणाहून ४०९ किलो वजनाचा तस्करी करीता साठवून ठेवलेला १ कोटी २२ लाख ७० हजार रूपये किंमतीचा गुंगीकारक, अंमली पदार्थ गांजा व गांजाची तस्करी करण्यासाठी वापरलेले वाहन महिंद्रा कंपनीची थार कार क्रमांक एम.पी१० झेड.डी ७२२२ रूपये १८ लाख अंदाजे किंमतीची असा एकुण १ कोटी ४० लाख ७० हजार रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आलेला असून, सदर गुंगीकारक अंमलीपदार्थ तस्करी करणारे १) नशीवखाँ सांडेखाँ पठाण, वय ४२ वर्षे, रा. कुंजखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर, २) इम्राण लियाकत खाँन, वय ३८ वर्षे, ३) मुक्तीयार मुसा खाँन, वय ४५ वर्षे, दोघे रा. वालसमद तहसील कचरावत जि. खरगोन मध्यप्रदेश, ४) विजय रामचंद्र नाहर, वय ३८ वर्षे, रा. आस्का जि. गजम राज्य ओरीसा, ५) रामकृष्ण हरकीत नायक, वय ३२ वर्षे, रा. बावनगंजम ता. टिजली जि.गंजम राज्य ओरीसा यांना मुद्येमालासह ताब्यात घेण्यात आलेले असून, कन्नड शहर पोलीस ठाणे येथे अंमलीपदार्थ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ एन.डी.पी.एस. यॅक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक आर.बी. सानप, सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक चाँद मेंढके, महादेव नाईकवाडे, परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक केशरसिंग जारवाल, टिलोकचंद पवार, पोहेकॉ कैलास निंभोरकर, जीवन लोदवाल, संजय आटोळे, पोना मोईस बेग, पोअं विजय चौधरी, बाबासाहेब वाघ, सतिष नरवडे, लक्ष्मण चव्हाण, सोमीनाथ गवळे, दिनेश खेडकर, पंकज गाभुड यांनी केलेली आहे.अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगराव सानप हे करीत आहेत.