महाराष्ट्र

गावठी कटटा (पिस्टल) बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

A1 CID NEWS, छत्रपती संभाजी नगर.        २३ मे शुक्रवार रोजी छत्रपती संभाजी नगर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंदे धारकावर गुन्हे दाखल करण्यासाठी शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीत असताना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार तांदुळवाडी शिवारात एक व्यक्ती गावठी कट्टा अग्नीशस्त्र सोबत बाळगून दहशत करण्याच्या उद्देशाने रस्त्यावर उभा आहे व तो येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात देत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरूण

खात्री केली असता तांदुळवाडी शिवारात बंद पडलेल्या हॉटेलच्या समोर रस्त्याजवळ हातात गावठी कट्टा बंदुक असलेला एक व्यक्ती अनुचित प्रकार घडवून आणण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले अमोल रावसाहेब विटनोर वय २७ वर्ष रा. मांजरी ता. नेवासा येथील रहिवासी आहे.आरोपीच्या 

ताब्यातून एक गावठी कट्टा पिस्टल/अग्निशस्त्र) मिळून हस्तगत करून त्याचे मॅगझीन खोलून बघितले असता त्यामध्ये दोन जिवंत काडतुस असा एकूण २७०००/-रुपयांचा मुददेमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.रावसाहब विटनोर या आरोपींवर सिल्लेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिल्लेगांव पोस्टे करत आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सतीष वाघ, सपोनि पवन इंगळे, पोउनि दिपक पारधे, नामदेव सिरसाठ, वाल्मीक निकम,विठठल डोके,शिवानंद बनगे, अशोक वाघ, संजय तांदळे तसेच पोस्टे सिल्लेगांवचे प्रभारी अधीकारी पोनि सलीम चाऊस ,बेद्रे, निसर्ग, धाडवळे यांनी सदरची कामगीरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp