महाराष्ट्र

चिचाळा येथे विहिरीत आढळला डोके नसलेला मृतदेह

पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील घटना

छत्रपती संभाजी नगर.नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस यांचा खून पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरातील चिंचाळा येथे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेले व न्यायालयातून सेवानिवृत्त झालेले लिपिक नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस वय ६५ वर्ष रा. छत्रपती संभाजी नगर न्यायालयातील सेवानिवृत्त या व्यक्तीचा स्वतःच्या मालकीच्या विहिरीमध्ये मुंडके नसलेले धड आढळून आले मुडक धडापासून तोडून धड विहिरीत टाकून त्यांचा खुन झाल्याची धकादायक माहिती समोर आली आहे.धड व डोके विहिरीत आढळले असून या घटनेने पैठण तालुक्यात खळबळ उडाली आहे हि घटना शुक्रवार ९ मे रोजी सकाळी उघडकीस आली असून. न्यायालयातून सेवानिवृत्त झालेले लिपिक नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस यांच्या मालकीची पैठण तालुक्यात चिंचाळा शिवारात गट नंबर १२१ या ठिकाणी शेती आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत २०२३/२४ मध्ये त्यांनी आपल्या शेतात विहीर बांधली अधून मधून चिंचाळा या ठिकाणी जाऊन शेती करीत होते. शुक्रवारी शेतीतील विहिरीमध्ये मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिक नागरीकांच्या निदर्शनास आल्याने लगेच नागरिकांनी पाचोड पोलिसांना खबर दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेतात अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि शरदचंद्र रोडगे यांनी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळ दाखल होऊन सदरील मृतदेह परिसरातील नागरिकाच्या मदतीने पाण्याबाहेर काढला. मुंडके नसलेल्या मृतदेहाबद्दल ओळख पटविण्यास अखेर पोलिसांना यश आले. विहिरीमध्ये व परिसरात मृतदेहाच्या मुंडक्याची शोध मोहीम हाती घेतली आहे. या व्यक्तीचे मुंडके कापून खून पूर्ववैमनस्यातून झाला का व इतर काही कारणाने झाला यासंदर्भात अधिक तपास पोलीस शोध घेत आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp