डांबर रोडवरील खंडे बुजविण्यासाठी सिमेंट कॉक्रेटचा वापर

A1-CID-NEWS– अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पैठण रोडवर मोठ्या प्रमाणात खंडे पडले असून.शेवगाव हद्दीतील डांबर रोडवरील खंड्डे दाबण्याचे काम चालू आहे.खंडे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांनी अजब टेक्नॉलेजीचा वापर केल्याचे दिसून येत आहे. डांबर रोडवर डांबर टाकण्या आवैजी सिमेंट माल टाकून खंडे दाबण्याचा अवैज्ञानिक प्रकार चालू केला असून.अशाप्रकारे खंडे बुजून अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी जनतेच्या नजरेत धुळफेक करत असून. डांबर आणि सिमेंट एक जिव होत नाही.सिमेट कॉक्रेट माल पुर्णतः हा घट्ट होण्यासाठी बारा तास लागतात हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे.परंतु इंजिनिअर व प्रशासकीय अधिकारी यांना यांचा विसर पडल्याचा दिसून येत आहे.लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी सिमेंट माल टाकून जनतेच्या पैशाची धुळधाणी करत असून.सामाजिक बांधकाम वरिष्ठ अधिकारी यांनी सीमट कॉक्रेटने दाबल्याले खंडे दाबल्या गेलेतका एकदा ग्राउंड लेवला येऊन त्याचा आढावा घ्यावा.दाबलेले खंडे पाठीमागून येणाऱ्या गाड्या उधळून लावत आहे. तरीदेखील हा प्रकार कशासाठी व कुणासाठी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केल्या जात आहे.