तिहेरी हत्याकांडाचा यशस्वी तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

छत्रपती संभाजी नगर
पैठण पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी किशोर पवार सर व जमादार नरेंद्र अंधारे यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले
संपूर्ण मराठवाड्यात गाजलेल्या पैठण येथील तिहेरी हत्याकांडाचा यशस्वी तपास करून आरोपींना न्यायालयापर्यंत पोहोचवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा ५. एप्रिल रोजी सन्मान करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास अतिशय कुशलतेने व तत्परतेने हाताळल्याबद्दल पैठण पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व तपासी अधिकारी किशोर पवार तसेच जमादार नरेंद्र अंधारे यांना मा. पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ. विनय कुमार राठोड तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व 3000 रुपयांची रोख रक्कम व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या सन्मानामुळे पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून, त्यांनी केलेल्या कारगिरीमुळे समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्यास निश्चित मदत होईल