मा.वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्या संकल्पनेतून सायबर शिल्ड प्रशिक्षण संपन्न

छत्रपती संभाजी नगर / मा. वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या संकल्पनेतून दि 8 व 9 एप्रिल रोजी कार्यशाळेचे प्रशिक्षण संपन्न झाले. सायबर गुन्ह्याचा तपास, त्यांना प्रतिबंध करणे, गुन्हे उघडकीस आणणे, तसेच अश्या गुन्ह्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करणे, याचप्रमाणे सायबर गुन्ह्याचा तपास करतांना गुन्ह्यांची मुख्य पध्दती तसेच तपास प्रक्रियेत लागणारे विविध टूल्स, डिजिटल पुरावे गोळा करणे, याच प्रमाणे पोलीसिंग मध्ये कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर (ए. आय. पोलीसिंग), सायबर सुरक्षा बळकट करणे, गुन्हेगारी प्रतिबंध, ओपन सोर्स इंटिलिजन्स वापर, या विषयावार आधारित पोलीसांना विस्तृत मार्गदर्शन होण्याचे दृष्टीकोनातून मा. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांचे संकल्पनेतुन “सायबर शिल्ड -2025 प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.दि. 8/4/25 व 9/4/25 असे दोन दिवसीय परिक्षेत्रीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नाथ स्कूल ऑफ बिझनेंस आणि टेक्नॉलॉजी, सायबर सुरक्षा फोरम यांचे सौजन्याने श्रीमती रत्नप्रभा पवार सभागृह, मासीआ, चिकलठाणा येथे करण्यात आले होते.
सायबर शिल्ड-2025 या प्रशिक्षण कार्यशाळामध्ये सायबर तज्ञ 1) श्री अमित दुबे, नॅशनल सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट 2) दिपक पटेल, क्रिप्टो एक्सपर्ट 3) श्री विजयंत गौर, डायरेक्टर जनरल, सायबर सेक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया 4) प्रा. अमोल वराडे, CISO , NSBT यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले आहे.या कार्यशाळेसाठी 02 सहाय्यक पोलीस अधीक्षक, 01 प्र. पोलीस उपअधीक्षक, सायबर पोलीस ठाणे येथील 22 अधिकारी तसेच परिक्षेत्रातील सर्व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील गुन्हे पडताळणी करणारे प्रत्येकी एक अंमलदार असे एकूण 05 अमलदार, परिक्षेत्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यातील एक पुरुष अमलदार याप्रमाणे 21 अंमलदार, परिक्षेत्रातील 88 पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अंमलदार याप्रमाणे 88 अंमलदार, परिक्षेत्रातील सायबर पोलीस ठाणे येथील 86 पोलीस अमलदार, असे एकूण परिक्षेत्रातील 40 अधिकारी व 200 अमलदार प्रशिक्षणाकरता उपस्थित होते.
सायबर शिल्ड कार्यशाळा ही मा. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक, मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, मा.श्रीमती अन्नपूर्णा सिंह, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विष्णू भोये, वाचक, उप अधीक्षक, श्री. महादेव गोमारे, प्र. पोलीस उप अधीक्षक (मु.), सपोनि योगेश धोंडे, जगदीश राऊत, सचिन पंडित, कोमल शिंदे, पो. उप. नि. संतोष मरळ, मनीषा जोगदंड, पोलीस अंमलदार संदीप वरपे, गणेश घोरपडे, राजेश राठोड, योगेश मोईम, संतोष तांदळे, अर्जुन जंगाळे,अमित कुलकर्णी, यांनी विशेष परिश्रम घेऊन यशस्वी रित्या पूर्ण केले आहे.