शेतकऱ्याच्या लढाईला यश, ९१ लक्ष भूसंपादन मोबदला शेतकऱ्यांना मंजूर,
ॲड. शिरोडकर पाटील यांनी दिला कायदेशीर लढा.

छत्रपती संभाजी नगर.कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी विटखेडा, चांभारवाडी, गल्ले बोरगांव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सन २००४ साली कार्यकारी अभियंता यांनी गोदावरी सिंचन महामंडळामार्फत “बृहत लघु पाटबंधारे कालवा अंतर्गत” देवगाव रंगारी जोडरस्त्यासाठी विठ्ठल महादू जाधव, सावळाराम साकराबा (मयत) वारस नामदेव सावळाराम सोनवणे, पुंडलिक खराटे (मयत) हौसाबाई पुंडलिक खराटे, सखाराम महादू जाधव (मयत) वारस दत्तू सखाराम जाधव, साहेबराव गहिनाजी कांबळे, मंदाबाई नारायण गोरे, शामराव कान्हू हिवाळे, गणपत मारोती गोल्हार, माणिक मारोती गोल्हार, श्रीकांत प्रभाकर सोनवणे, संजय प्रभाकर सोनवणे, विजय प्रभाकर सोनवणे, बापूआप्पा आसारामआप्पा, छबूआप्पा आसारामआप्पा, एकनाथ रखमाजी केरे, नेमीचंद आमचंद पांडे, पारसकुमार नेमीचंद पांडे, धर्मेंद्रकुमार नेमीचंद पांडे, माधव व्यंकटराव रत्नपारखी, दिपक व्यंकटराव रत्नपारखी, शहजादबी इस्माईल सय्यद, वाल्मिक बाबासाहेब यादव, कोंडीराम शेकूजी बल्लाळ, रामनाथ भागीनाथ गोरे, ठगनाबाई एकनाथ, आसराबाई दगडू केरे, सुर्यभान शिवराम गोरे, उमेश बाबूलाल गोरे, ज्ञानेश्वर हरिचंद गोरे, चंद्रभान हरिचंद गोरे, लक्ष्मण आसाराम अहिरे आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या परंतु सदरील शेतकऱ्यांना केवळ रक्कम रु. ८२ हजार प्रती एकर प्रमाणे मोबदला अदा केला जो की, तो अत्यंत अत्यल्प होता. या संदर्भात शेतकऱ्यांनी या कमी मोबदल्याचा आक्षेप दाखल केलेला होता परंतु वाढीव मोबदला कसा व कोठे काढता येईल यासंदर्भात शेतकऱ्यांना योग्य कायदेशीर माहिती नसल्याने त्यांनी प्रख्यात वकील ॲड. किशोर उत्तमराव शिरोडकर (पाटील) यांच्या मार्फत खटला दाखल के
ला व यात विधीज्ञानी भूसंपादनाचे प्रकरणे उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी कन्नड यांच्या न्यायालयात दाखल केले व शासनाने दिलेला मोबदला हा कसा कमी आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत वेळोवेळी सुनावण्या घेण्यात आल्या असून भुसंपादन कायदा १९८४ चे कलम २८ अ नुसार प्रारुप निवाडा घोषित करत शेतकऱ्यांच्या हक्काचा वाढिव मोबदला शासनाने ३१ मार्च २०२५ रोजी या सर्व शेतकऱ्यांना एकूण रक्कम रुपये ९१,००,०००/- (अक्षरी- एक्याण्णव लक्ष) रुपयाचा भूसंपादनाचा मंजूर करण्यात येऊन तो विहीत मुदतीत धनादेश वाटप करण्यात यावे अशी मागणी करत याचीकाकर्त्यातर्फे ॲड. किशोर शिरोडकर पाटील यांनी काम पाहिले तर त्यांना ॲड. दादासाहेब सोनवणे (शेकटेकर), ॲड. गोपाल धनगे यांनी मोलाचे साथ दिली.