ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर ग्रामीण वहातूक शाखेची कारवाई

छत्रपती संभाजी नगर.बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण वाहतूक शाखेने ५ एप्रिल शनिवार रोजी ओव्हरलोड हायवाट्रक वर कारवाई केली. ट्रकमध्ये शमते पेक्षा जास्त वजन ओव्हरलोड माति माल आढळून आला, त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.अशाप्रकारच्या वाहतूकिमूळे अडथळा निर्माण होउन अपघात होण्याची शक्यता अधिक असते.बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत पैठण रोडवर बिना नंबर प्लेट ओव्हरलोड व माती, मुरूम,रेती, अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वेळोवेळी कारवाई होने अपेक्षित आहे असे मत सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केले जात असून.यापुढेही वहातूक शाखेकडून कारवाया चालूच राहील असे जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी म्हटले आहे.ओव्हरलोड वाहतूक ही कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर पवार, पोलिस जमादार बाळासाहेब लोणे, विक्रम बागल यांनी केली.