महाराष्ट्र

जिल्हा पोलीस दलास एक क्लिक वर मिळणार गुन्हेगारांची माहिती

अद्यावत एम.ओ.बी.सजेशन ॲप चे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे हस्ते अनावरण

              छत्रपती संभाजीनगर

ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय गुन्हेगाराची गुन्हे करण्याची पध्दतीसह, त्याचा संपुर्ण अभिलेख हा आता एक क्लिकवर ग्रामीण पोलीस दलातील तपास अधिकारी यांना उपलब्ध होणार आहे.गुन्हेगाराची माहिती ही यापूर्वी मॅन्युअल पध्दतीने संकलीत करून ठेवण्यात येत होती. गुन्हा घडल्यानंतर गुन्हयाचे मोड्स नुसार त्याप्रकारचे गुन्हे करणा-या आरोपीची माहिती काढण्यात पोलीसांचा बराच वेळ लागत होता. पोलीसांना गुन्हेगाराची माहिती ही ऑनलाईन पध्दतीने तात्काळ उपलब्ध होण्याचे अनुषंगाने मा. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांचे संकल्पनेतून तसेच डॉ. विनयकुमार राठोड यांचे मार्गदर्शनाखाली तसेच देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांचे माध्यमांतुन गुन्हेगारांची अद्यावत माहिती असलेले एम.ओ.बी. सजेशन एप्लीकेशन ( ॲप ) ची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये १८३६ गुन्हेगारांचा गुन्हयांचे अनुषंगाने वर्गीकरण करून माहिती संकलित करण्यात आली आहे.

या अॅप्लिकेशन (अॅप) चे आज दिनांक ०४/०४/२०२५ रोजी मा. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, यांचे हस्ते अनावर करण्यात आले आहे. याप्रसंगी मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, डॉ. सुभाष लहाने, संचालक), देवगिरी इन्स्ट्यूट ऑफ इंजिनिरींग अॅन्ड मॅनेजमेंट स्टडीज, श्री. गोपाळ बुरकूल, प्राध्यापक, तसेच अॅप्लिकेशन तयार करणारे विद्यार्थी साहिल पाटील, अनुषंका गायकवाड, सृष्टी येळमकर, अथांक वानखेडे, यांचेसह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

याप्रसंगी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि, स्मार्टपणे तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांची माहिती ही ऑनलाईन पध्दतीने संकलित केल्याने हा डिजीटल डाटा कायमस्वरूपी संरक्षित केला जातो. यामुळे गुन्हा घडल्यानंतर एक क्लिकवर तपास अधिकारी यांना गुन्हयाचे स्वरूपानुसार गुन्हेगांराची माहिती उपलब्ध होणार आहे. मॅन्युअली एम.ओ.बी. सजेशन मिळविण्यात लागणारा अधीकचा वेळ वाचरणार असुन या प्रणालीचा फायद्या परिक्षेत्रातील जिल्हयांना होणार असल्याचे यावेळी नमूद केले आहे.

सदरचे एप्लीकेशन तयार करण्यासाठी डॉ विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली श्री सतिश वाघ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाख, रविंद्र लोखंडे, सचिन ढवळे, पोहेकों / तिडके यांनी परिश्रम घेतलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp