इनकोर फार्मा औषध कंपनीला आग एकाचा मृत्यू दोन जखमी

छत्रपती संभाजी नगर.पैठण एमआयडीसी येथील इनकोर फार्मा औषध कंपनीला शनिवार २६, एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर कंपनीमध्ये वेल्डिंग काम चालू असताना अचानक आग लागली या आगीत एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला. रामदास जगन्नाथ बडसल वय ५५ असे मृत कामगाराचे नाव आहे.
पैठण एमआयडीसी परिसरात गट क्रमांक पाचमध्ये इनकोर फार्म प्रा. लि. औषध कंपनीमध्ये दुपारी तीन वाजेच्या दरम्यान कंपनीचे काही कामगार वरच्या मजल्यावर वेल्डिंग काम करत असताना हि घटना घडली कंपनीतील केमिकल व थर्माकोलवर आगीच्या ठिणग्या पडल्याने अचानक मोठ्या प्रमाणावर आग लागली. आग लागल्याची माहिती निदर्शनास येताच तात्काळ कंपनीतील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. यावेळी कंपनीत लागलेल्या आगीमुळे कंपनीमध्ये प्रचंड धूराचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना कंपनी बाहेर पडने कठिण झाल्याने तीन कामगारांना कंपनीच्या बाहेर पडणे अशक्य झाले नाही.प्रयत्न अंती दोन कामगार सुखरूप बाहेर आले. परंतु रामदास जगन्नाथ बडसल यांना आगेच्या धुरामुळे कंपनी बाहेर पडता आले नाही. या दरम्यान छत्रपती संभाजीनगर व पैठण येथील अग्रिशमन दलाच्या जवानांनी तीन तास शर्यतीचा प्रयत्न करून बेशुद्ध अवस्थेत बडसल या कामगारास कंपनी बाहेर काढण्यात आले. तातडीने या कामगारास पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी सदरील कामगाराला तपासून मयत घोषित केल
या घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, हे घटनास्थळी दाखल झाले.
या कंपनीत जवळपास ४००, हुन अधिक महिला व पुरुष कामगार नेहमीप्रमाणे काम करत असताना.अचानक लागलेल्या आगीमुळे कामगारांत प्रचंड खळबळ उडाल्याने कामगारांनी कंपनी बाहेर पडून सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतला.एमआयडीसी सपोनि ईश्वर जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक संभाजी झिजुर्डे यांनी घटनास्थळ धाव घेऊन मदत कार्य करणाऱ्यांना सहकार्य केले.या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाकडून अहवाल घेऊन आज रविवारी रोजी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सपोनि ईश्वर जगदाळे यांनी दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संभाजी झिजुडें हे करीत आहे.