महाराष्ट्र

सेवाशक्ती संघर्ष एसटी युनियन पुणे विभागाच्या उपाध्यक्षपदी अनंतराजे कराड यांची निवड

मधुकर केदार अहमदनगर . पुणे विभाग एसटी महामंडळामध्ये कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी तत्पर असणारी सेवाशक्ती संघर्ष एसटी युनियन च्या नवीन पदाधिकारी यांच्या निवड करण्यात आली या मध्ये कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणीत सोडवण्यासाठी सतत तत्पर असणारे एसटी कामगार नेते अनंतराजे कराड तालुका पाथर्डी यांची पुणे विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .त्यांच्या निवडीबद्दल आमदार गोपीचंद पडळकर,आमदार सदाभाऊ खोत,सतीश मेटकरी, राज्य कार्यकारणी सदस्य गणेश खटके, राज्य कार्यकारणी सदस्य नाथबाबा नलावडे, चौरे,जायभाय, कांदे यांनी अनंतराजे कराड यांची एसटी युनियन उपाध्यक्षपदी निवड झाल्याने शुभेच्छा दिल्या.तसेच त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp