महाराष्ट्र

तोडोळी येथील शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन तात्पुरते स्थगित

कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

 छत्रपती संभाजी नगर पैठण तालुक्यातील तोडोळी सह पंचक्रोशीतील गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ब्राम्हगव्हाण उपसा जलसिंचन योजनेच्या भाग २ च्या टप्पा १ कॅनल चे काम पुर्ण होऊन वर्षे उलटले आहे.तरी देखील पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्याची प्रक्रिया अद्याप पुर्ण झाली नाही. त्यानुषंगाने तोडोळी सह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आक्रमक भुमी का घेऊन फेब्रुवारी महिना अखेर पर्यंत कॅनलला पाणी सोडा अन्यथा त्रिव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पाटबंधारे अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. फेब्रुवारी अखेर पर्यंत पाणी न सोडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ७ मार्च शुक्रवार रोजी पाटबंधारे विभागाच्या नाकर्ते पणाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शेतकर्यांचे सामुहिक मुंडन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुंडन आंदोलनाच्या तयारीत गेलेल्या शेतकर्याना कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे, उप अभियंता विठ्ठल गावंडे यांनी संतप्त शेतकऱ्यांच्या भावना समजून त्यांना विश्वासात घेऊन सकारात्मक यशस्वी चर्चा घडवून आणली सदरील कॅनलचे काम ९५% पुर्ण झाले आहे.काही तांत्रिक अडचणी मुळे विलंब झाला आहे. लवकरच काम प्रगती पथावर घेऊन ३० मार्च पर्यंत कॅनलला पाणी सोडण्यात येईल अशा प्रकारे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आंदोलनकर्ते चेअरमन प्रभाकर तांबे, भिकन गुंजाळ, प्रविणशेठ गरड, कारभारी उघडे, उत्तमराव गरड, रमेश गुंजाळ, रामदास नरवडे, साहेबराव गरड, दिपक वाकडे, अमोल जाधव, गणेश वाघचौरे, करीम शेख, अजय शेळके, पत्रकार मधुकर बर्फे, दिलीप जोशी यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button