स पो नि.शरदचंद्र रोडगे यांना माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यात विरगाव पोलीस ठाणे

राज्यात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तृतीय स्थानावर
सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते पारितोषिक व पन्नास हजार रुपये बक्षीस देऊन सन्मान करुन २०२२ या वर्षासाठी तृतीय क्रमांकाचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस ठाणे पुरस्कार प्रदान करण्यात आला.१ मार्च २०२५ शनिवार रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या क्राईम कॉन्फरन्स मध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांना हा बहुमान मिळाला आहे .राज्यात कायदा व सुव्यवस्था गुन्हे प्रतिबंध दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी विविध निकषाच्या आधारे सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड प्रक्रिया घेण्यात येते.२०२२ च्या निवड समितीने राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्य प्रणाली निकषांच्या आधारावर राज्यातील पोलीस ठाण्यातील कारभाराची पडताळणी केली होती.छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मधील विरगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी २०२२मध्ये वीरगाव पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे उघड, निर्गती, दोषसिद्धी, प्रशासन, आस्थापना, जनसंपर्क, इत्यादी निकषांमध्ये उत्कृष्ट कार्य केले आहे.त्यांच्या या उत्कृष्ट कार्यामुळे पोलीस ठाणे विरगाव हे राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे ठरविण्याचा बहुमान मिळाला आहे.