महाराष्ट्र

पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, व अपर पोलीस अधीक्षक, मा. अन्नपूर्णा सिंह, यांचे उपस्थित सोवानिवृत्त कार्यक्रम संपन्न

छत्रपती संभाजी नगर.मा. डॉ.विनयकुमार राठोड, ग्रामीण पोलीस अधीक्षक व मा. अन्नपूर्णा सिंह, अपर पोलीस अधीक्षक, मा. डॉ. विशाखा राठोड यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरुन नियमित वयोमानानुसार ३१. मार्च सोमवार रोजी सेवानिवृत्त वाल्मीक माधवराव चव्हाण श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ३९. वर्षे सेवा संजय तुकाराम जीवरग श्रेणी पोलीस उपनिरीक्षक , श्रेणी पोलीस उप निरीक्षक,३३ वर्षे सेवा मदनसिंग किसनदास राठोड , श्रेणी पोलीस उप निरीक्षक,३३ वर्षे सेवा यांचा सपत्नीक कुटूंबासह पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी सपत्नीक सेवानिवृत्त होत असलेले पोलीस अधिकारी यांचा स्मृतीचिन्ह व भेटवस्तु देवुन कुटूंबा सह त्यांचा सत्कार गौरव करण्यात आला.

यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करताना पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधी पर्यंत बजावलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन करुन कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांना पोलीस सेवे दरम्यान कुटूंबाला पाहिजे तसा वेळ दिला गेला नाही आणि डयुटीच्या अनिश्चित वेळेमुळे स्वत:चे प्रकृतीकडे सुध्दा लक्ष देणे शक्य होत नसल्याने त्यांना सेवानिवृत्ती नंतर सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करून स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष देणे बाबत भावना व्यक्त केली. तसेच ते जरी आज पोलीस दलातुन सेवानिवृत्त होत असले तरी यापुढे सुध्दा सदैव पोलीसदल हे त्यांच्या सोबतच राहील असे आश्वासन देवुन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या आहेत. 

तसेच सेवानिवृत्ती नंतर कोणालाही सेवा लाभ मिळविण्यासाठी कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची वेळ निर्माण होणार नाही, याकरिता प्राधान्याने सर्वांना पेन्शन व इतर सेवा निवृत्ती नंतर अनुज्ञेय लाभ हे सेवानिवृत्त होत असलेल्या दिवशीच मा. पोलीस अधीक्षक यांचे निर्देशानुसार तत्परतेने वितरीत करण्यात आले आहे. सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ मिळाल्याने सेवानिवृत्त अधिकारी यांनी समाधान व आनंद व्यक्त करून पोलीस अधीक्षक यांचे आभार मानले आहे.

तसेच याप्रसंगी सेवानिवृत्त होणारे अधिकारी यांचे पाल्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आपल्या वडिलांचे प्रती व त्यांनी समाजाकरिता बजावलेल्या पोलीस सेवेकरिता आदर व कृतज्ञता व्यक्त केली आहे. यावेळी आशिष चव्हाण यांनी वडिल पोलीस सेवेत असल्याने सण- उत्सवाचे वेळी वडिलांची वाट बघण्यात बराच कालावधी जात होता परंतु आता वडिलासोबत यापुढे राहता येईल त्यामुळे प्रत्येक सणाचा आनंद द्विगुणीत होईल असे मत व्यक्त केले आहे.

सेवानिवृत्ती कार्यक्रम अनुषंगाने श्री. महादेव गोमारे, प्र. पोलीस उप अधीक्षक (मु.), सचिन पंडीत, स.पो.नि. पोलीस अंमलदार ,हबीब शेख, प्रविण पंडित, आशा बांगर, यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp