पैठण पंचायत समिती गोडाऊन मध्ये आग लाखोचे साहित्य जळून खाक

पैठण : पंचायत समिती विभागातील गोडाऊनला लागलेल्या आगीत विविध प्रकारचे लाखो रुपयांचे साहित्य जळून राख. गोडाऊन मध्ये: समाज कल्याण विभाग,एम आर जि एस, घरकुल व इतर योजने अंतर्गत लाभार्थींना देण्याचे साहित्य गेली अनेक वर्षांपासून दाबून ठेवले होते.१५ मार्च शनिवार रोजी सकाळी पैठण नगरपालिका कर्मचारी यांनी गोडाऊन परिसरात कचरा पेटून दिल्याने हि आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.गोडाऊन मध्ये लागलेल्या आगीत सौर दिवे, सौर ऊर्जा पॅड, बॅटरी, लोखंडी नांगर, निधुर शेगडी, अंगावर घेण्याचे उबदार रंगी, सौचालय भांडे कार्यालयीन महत्वाचे दस्तावेज, अशाप्रकारे अनेक वस्तूचा साठा मोठ्या प्रमाणात जळाला आहे. उपस्थितांना गोडाऊन मध्ये आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी पैठण अग्नीशमन दलाच्या वाहनास तात्काळ बोलावून आग आटोक्यात आणली.या घटनेची माहिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पाहाणी केली.दरम्यान साहित्या बाबत गटविकास अधिकारी व कर्मचारी यांना विचारना केली असता जळालेल्या वस्तू समाज कल्याण, घरकुल,व इतर योजनेतील२०१०,११, च्या आसपास मागील काही वर्षांपूर्वीचे जुने साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले यातील काही साहित्य वाटप करण्यात आले होते.परंतु उर्वरित साहित्य गेली अनेक वर्षांपासून धूळखात गोडाऊन मध्ये पडून राहिले.सार्वजनिक मालमत्तेचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळेत वाटप केले असते तर लाखो रुपयांचे नुकसान आजघडीला झाले नसते. डोळे झाकपने १४ ते १५ वर्षांपासून साहित्याचा सांभाळ कशासाठी व कुणाच्या आदेशाने आजवर राखून ठेवला.अशाप्रकारे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.