पैठण महसूल अधिकाऱ्याचा खाजगी एजंट १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी पथकाच्या जाळ्यात

पैठण तालुक्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना लाच खोरीचा मोह आवरेना खाजगी एजंट ना हाताशी धरून अवैध वाळू वाहतुकीचे वाहन सोडण्यासाठी १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महसूल विभागातील अधिकाऱ्याचा हस्तक आरोपी सलीम करीम शेख वय ३८ वर्ष रा. लक्ष्मीनगर पैठण या एजंट सह अधिकाऱ्याला अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक एसीबी विभागाच्या पथकाने ३ मार्च सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पकडले.एसीबीने ज्या अधिकाऱ्याला उचलले, त्यांचा पाठीराखा एक राजकीय नेता असल्याची चर्चा समोर येत आहे.पैठण हिरडपुरी येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारी ५ वाहने अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी पकडली होती. यातील एका वाहनाचा दंड वसूल करूनही ते वाहन पैठणच्या महसूल विभागाने सोडले नाही. ते वाहन सोडण्याकरीता ३ लाख रुपयांची लाच मागणी करण्यात आली.तडजोडीअंती २ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार ९० हजार रुपये एजंटमार्फत अधिकाऱ्याला देण्यात आले.मात्र पुढे लाच देण्याची इच्छा नसल्याने वाळू व्यावसायिकाने अहिल्यानगरच्या एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने हिरडपुरी येथे उर्वरित १ लाख १० हजार रुपयांची लाच देताना सापळा रचून.वाळू व्यावसायिकाकडून खासगी एजंटने १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना. त्याला एसीबीने रंगेहाथ पकडले. अधिकार्याचा हस्तक हप्ते वसुली एजंट सलीम करीम शेख पैठण यांचा जबाब नोंदवल्यानंतर त्याचा कर्ताकरविता पैठण तहसीलदार सारंग चव्हाण असल्याचे समोर आल्यावर त्यालाही एसीबीने ताब्यात घेतले. मात्र या प्रकरणात कारवाई होऊ नये म्हणून राजकीय दबाव आल्याची चर्चा समोर येत आहे. दरम्यान, एसीबीच्या पथकाकडून मध्यरात्री साडेबाराला या लाचखोर अधिकाऱ्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील घराची झडती घेतल्याची माहिती मिळत आहे . झडती दरम्यान काय हाती लागले, हे कळू शकले नाही.सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.