महाराष्ट्र
मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने केले जेरबंद
दोन्ही आरोपी पैठण तालुक्यातील तोडोळी येथील

- क्राइम न्यूज छत्रपती संभाजी नगर नवरात्र उत्सव कर्णपुरा यात्रेदरम्यान चोरी केलेल्या मोटार सायकली विक्री करीता आनलेल्या दोन चोरास गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे २४.मार्च सोमवार रोजी गुन्हे शाखेने उत्कृष्ट कामगिरी केली असून.गुन्हे शाखेला गुप्त बातमी दारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की,दोन इसम चोरीची मोटार सायकल विक्री करण्यासाठी कर्नपुरा यात्रा मैदान येथे येणार आहेत. त्यावरुन गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावुन कर्णपुरा यात्रा मैदान येथुन अजय विजय वाकडे, वय २२ वर्ष, व कैफ रफीक शेख, वय २० वर्ष, दोघेही राहणार तोंडोळी बीडकीन ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर यांना विना क्रमांकाच्या मोटार सायकलसह ताब्यात घेवुन विचारपुस केली असता नवरात्र कर्णपुरा यात्रेदरम्यान त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हयातील विविध भागातून मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे.आरोपी मोटार सायकल विक्री करता ग्राहकाच्या शोधात असून आरोपीना ग्राहक मिळून न आल्याने, सदरच्या मोटार सायकली दोन वेगवेगळया ठिकाणी लपवून ठेवलेल्या एकुण १४ मोटार सायकली गुन्हे शाखेच्या ताब्यात काढुन दिल्या आहेत.नमुद मोटार सायकली दोन पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त करण्यात आल्या आहेत. अभिलेखाची पडताळणी केली असता गुन्ह्यातील मोटार सायकली असल्याचे निष्पन्न झाले आहे.१०,००,००० किमतीचा ज्यामध्ये विविध प्रकारच्या १४ मोटरसायकल सह मुद्देमाल जप्त केला आहे.उर्वरीत मोटार सायकली बाबत अभिलेखाची तपासणी प्रगतीपथावर असून. अजय विजय वाकडे व कैफ रफीक शेख, या मोटरसायकल चोरी करणाऱ्या नमुद आरोपींना पोलीस ठाणे छावणी येथे गुन्हयाचे तपासकामी हजर करण्यात आले आहे. गुन्हा उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी व अंमलदार रविकांत गच्छे, सहायक पोलीस निरीक्षक, पो.कॉ. प्रकाश गायकवाड, पो.कॉ. शाम आडे, पो.कॉ. संतोष भानसे.तपास सहकार्य पोअ.अंतोष चौरा,पोअ.अश्वलिंग होनराव पोअ.नितीन देशमुख,पोह.अशरफ सय्यद,पोह.ज्ञानेश्वर पवार यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.