Uncategorized

महावितरण कंपनीचा अजब कारभार विज चोरांना सुट मिटर धारकांची लुट

पैठण: तालुक्यात मोठ्या प्रमाणात विज चोरीचे प्रमाण वाढले आहे. गाव शहर गल्ली बोळात घर बिल्डिंग कंट्रक्शन या सारख्या अनेक ठिकाणी खुलेआम लाइट पुरवठा करणाऱ्या तारेवर आंकडे टाकून विज चोरी केल्याचे दिसून येत आहे.हा सर्व प्रकार गेली अनेक वर्षांपासून चालू असून. महावितरण प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास येऊनही कार्यवाही केल्या जात नाही.त्याचा काहीही संबंध नसल्या प्रमाणे कर्मचारी व अधिकारी वर्ग वागत आहे. या मागिल नेमके कारण काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे . महावितरण कंपनिचे कर्मचारी व कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेले प्रायव्हेट मिटर रिडिंग घेणारे कर्मचारी यांना हाताशी धरून आंकडे धारकांचा पराक्रम सुरळीत चालू आहे. आंकडे टाकून घरामध्ये अनेक इलेक्ट्रिक,इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा फ्रि सर्व्हिस सेवेचा आनंद घेत आहे. काही कारणास्तव मिटर धारकांना बिल भरणा करण्यास विलंब झाल्यास महावितरण कर्मचारी व अधिकारी बिल भरणा करण्यासाठी दारावर येऊन तगादा लावतात किंव्हा लाइट कट करण्याची धमकी देतात.परतु विज चोरी करणार्या आंकडे धारकाचे काहीच का करत नाही हे महावितरण कंपनिचे…. आहेत का. महावितरण कंपनीच्या वाढिव दरामुळे मिटर धारक महिन्याला येणाऱ्या लाइट बिलाचा आकडा पाहून त्यांच्यावर चक्राउन जाण्याची वेळ लाइट बिल भरणा करणाऱ्या ग्राहकांवर येत आहे. आंकडे धारकांना सुट मिटर धारकांची लुट अशाप्रकारे महावितरण कंपनी व अधिकार्याचा अजब कारभार चालू असून विज चोरी करणाऱ्या कडे काना डोळा केला जात असून. कार्यालयीन सब डिव्हिजन अधिकारी पैठण यांचे तालुक्यातील विज चोरी प्रकरणी जाणिवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp