म्हारोळा येथे शेततळ्यात बुडून दोन परप्रांतीय तरुणांचा मृत्यू
गट नंबर २०६ शेत जमीन मालक नंदकिशोर जयराम पाहुणे पाटिल यांच्या शेतात घडली घटना

छत्रपती संभाजी नगर पैठण तालुक्यातील म्हारोळा गावात गट नंबर २०६ या शेतातल्या शेततळ्यात दोन परप्रांतीय मजूरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना ३ मार्च सोमवार रोजी दुपारी ३,३० वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.या घटनेची बिडकीन पोलीस यांना माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके हे आपल्या पोलीस टिम सह घटनास्थळी दाखल होऊन सदरील घटनेची पहानी केली.गट नंबर २०६ शेत जमीन मालक नंदकिशोर जयराम पाहुणे पाटिल व्यवसायाने वकील रा छत्रपती संभाजी नगर यांनी म्हारोळा येथील शेतात अंदाजे अर्धा एकर शेततळे तळार केले आहे त्याच शेततळाला लागून दोन मजली फार्महाऊस बनवले असून.त्या फार्म हाऊसच्या फर्निचर कामासाठी छत्रपती संभाजी नगर येथून दोन कारागीर कामासाठी आनले होते. हे दोघे दुपारी तळ्यात अंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांना वर येता आले नाही त्यांनी वर येण्यासाठी अर्धा इंची रबरी पाइप बांधला होता.परतू तो पाइप तुटल्याने त्यांना वर येता आले नाही.त्यामुळे या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.रामकिशोर जांगीड वय २७ वर्ष,प्रल्हाद ओमपुरी वय २७ वर्ष, रिहमवाडी तहसिल, जिल्हा नागोर राजस्थान येथील रहिवासी होते. स्थानिकांच्या मदतीने एका मयत तरुणाला बाहेर काढले परंतु दुसरा व्यक्ती तळ्यात न सापडल्याने कांचनवाडी येथील अग्निशमन फायर टेशन पथकाच्या टिमला बोलावण्यात आले.सदरील पथकाने रात्री ८ वाजेच्या दरम्यान तळ्यातून डेड बॉडी काढून पोलिसांचे ताब्यात दिली. यावेळी बिडकीन सपोनी निलेश शेळके व बिट जमादार योगेश नाडे यांनी आपल्या टिमच्या सहायाने डेट बॉडी ॲम्बुलन्स मध्ये टाकून बिडकीन शासकीय रुग्णालय येथे पुढिल प्रक्रियेसाठी रवानगी केली.
मुख्य अग्निशमन अधिकारी संपत के.भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी अशोक खांडेकर,ड्युटी अधिकारी विनायक कदम,अग्निशामक जवान
कमलेश सलामबाद,विशाल घरडे ,तुषार तोर,रामा शंकर विश्वकर्मा,वाहन चालक भुरालाल सलामपुरे कांचनवाडी अग्निशमन फायर टेंशन पथकाच्या टिमने घटनास्थळी येऊन शेत तळ्यातील मयतास बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू मोहीम राबवली