कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेत पैठण नाथसागरात महिलेचा मृतदेह आढळला
अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा पंप हाऊस जायकवाडी पैठण धरणात नाथसागर परिसरात लाल रंगाच्या बेडशीट मध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत अज्ञात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेच्या कमरेला दगड बांधलेला असल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.अद्याप या महिलेची ओळख पटली नसून. या संदर्भात पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सदरील महिलेची ओळख पटविण्यासाठी परिसरात तपास कार्य करत आहे.
महिलेचा मृतदेह नाथसागर जलाशयात आढळून आला याची माहिती १ मार्च शनिवार रोजी सकाळी एमआयडीसी सपोनि ईश्वर जगदाळे यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला.सदरील महिला बेडशीट मध्ये गुंडाळून कमरेला दगड बांधलेला असल्याचे निदर्शनास आले.या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने धरणाच्या पाण्यात फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.