महाराष्ट्र

४ कीलो गांजा सह चौघांना ताब्यात वाळूज पोलिसांची कारवाई

गांजा व वाहतूकीसाठी वापरलेल्या दोन मोटरसायकल जप्त

छत्रपती संभाजीनगर वाळूज महानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अंमली पदार्थ नशाखोरी विरुद्ध छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी जिल्हा स्तरीय मोहीम छेडली आहे. या मोहिमेत वाळूज पोलिसांनी चौघांना पकडून ४ किलो ३ ग्रॅम ६४,६०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या दरम्यान गांजा वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहे.ही कारवाई गुरुवारी ६ मार्च सायंकाळी सातच्या सुमारास लांझी फाटा खामनदी पुलाजवळ करण्यात आली.अतिष सुरेश पवार रा. प्रवरासंगम संभाजी ऊर्फ दत्ता किसन सोनगीरे रा. साजापूर, साहील ऊर्फ मिंडा बाबासाहेब पिंपळे रा. अशोकनगर श्रीरामपूर, दादा वसंत साळुंके रा. गुरुधानोरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाळूज पोलिसांच्या विशेष पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की दादा साळुंके व त्याचे तीन साथीदार गांजा विक्रीसाठी बिडकीन ते छत्रपती संभाजीनगर असे लांझीमार्गे जाणार आहेत. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, पोलीस अंमलदार श्री. धनेधर, विजय पिंपळे, सुधारक पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, मल्हार गरगडे यांनी मिळून लांझी फाट्याजवळील खामनदीच्या पुलाजवळ सापळा रचला. चौघांना पकडून त्यांच्याकडून किलो गांजा जप्त केला. त्यांच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त संजय सानपयांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे, पोलीस अंमलदार श्री. धनेधर, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, सुधारक पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, मल्हार गरगडे यांनी पार पाडली

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp