२५ हजारांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

क्राइम न्यूज : छत्रपती संभाजी नगर.महावितरण बिडकीन उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेला कनिष्ठ अभियंता अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ११ मार्च रोजी १२ वाजेच्या दरम्यान बिडकीन महावितरण कार्यालय समोर असलेल्या रसवंती ग्रहावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.आरोपी महेश काशिनाथ घावट वय ३५ वर्षे पद. महावितरण कनिष्ठ अभियंता वर्ग ०३ नेमणूक कार्यालय बिडकीन उपविभाग पैठण असे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या अधिकार्यांचे नाव आहे.पैठण तालुक्यातील मौजे टाकळी येथील शेतकऱ्यांने शेतातील ०५ संच सौर ऊर्जा पंपाचा मंजुरी अर्ज करुन त्याबाबत रितसर फिस भरली होती. त्यानंतर महावितरण कार्यालयीन मंजुरी देण्याकरिता आरोपी लोकसेवक यांने यातील तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष २५ हजारांची मागणी केली होती. तडजोडी अंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने एंटी करप्शन ब्यूरो विभागाकडे तक्रार केली त्याअनुषंगाने सावळा रचून मागणी केलेले २० हजार रुपये आरोपी महेश घावट पंचासमक्ष स्विकारताना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक संदिप आटोळे, अप्पर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव पोलिस उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक केशव दिंडे ,पोलिस हे. कॉ. नागरगोजे, आत्माराम पैठणकर, चालक ताटे पोलिस अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.
सुपर