Uncategorized

दिल्ली न्यायमूर्तींच्या बंगल्याला आग अग्नी विझला पण बिंग फुटले

अग्नीशमन दलाला बंगल्यात सापडले पैशांचे घबाड

क्राइम न्यूज.दिल्ली उच्च न्यायालयालयातील न्यायमूर्तीच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम मिळाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने या प्रतापी न्यायमूर्तीना त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजेच अलाहाबादच्या हायकोर्टात बदली करण्याची शिफारस केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या न्यायमूर्तींच्या सरकारी निवास स्थानाला आग लागली होती, ही आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाला त्या घरात मोठ्या प्रमाणावर पैशांचा साठा सापडला होता.

यशवंत वर्मा असे या न्यायमूर्तीचे नाव असून काही न्यायमूर्तीनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. जर वर्मा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर सर्वोच्च न्यायालयाने १९९९ च्या प्रक्रियेनुसार तपास सुरु करावा, अशी मागणीही केली जात आहे.दिल्ली हायकोर्टाच्या जजच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडल्याने न्यायपालिकेत खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वात वर्मा यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जेव्हा आग लागली तेव्हा वर्मा हे दिल्लीत नव्हते. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला बोलविले होते. आग विझवतअसताना एका खोलीत अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कॅश सापडली.पोलिसांनी याची माहिती ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांना दिली. तेथून सर्वोच्च न्यायालयाला याची सूचना देण्यात आली. वर्मा हे २०२१ मध्ये अलाहाबादहून दिल्लीत आले होते.उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदलीची शिफारस करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने तातडीची बैठक घेण्यात आली आहे.काही जज न्यायपालिकेची छवी चांगली ठेवण्यासाठी त्यांच्यावर महाभियोग दाखल करण्याची मागणी करत आहेत. नुसती बदली केली तर न्यायपालिकेवर जनतेचा विश्वास रहाणार नाही जज कमीटिचे मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp