बिडकीन येथे श्री स भु प्रशालेत विद्यार्थ्यांकडून बाल मजुरी करून घेण्याचा प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर .पैठण तालुक्यातील बिडकीन येथील श्री सरस्वती भुवन सुंदर माझी शाळा पुरस्कार प्राप्त शाळेत ज्ञान दान हक्कांची पायमल्ली.बालवयात विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वोझे झेपता झेपेना त्यात श्री स भु प्रशालेय व्यवस्थापन कमेटी यांनी भर टाकून विद्यार्थी कडून बाल मजुरी करवून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार बिडकीन येथील सरस्वती भुवन प्राथमिक शाळेत २५ मार्च मंगळवार रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे.शालेय पोषण आहार बनवण्यासाठी लागणाऱ्या लाकडांची वाहतूक करण्याचे काम थेट विद्यार्थ्यांकडून करवून घेतले जात असल्याचे दिसून आले आहे.ट्रॅक्टर ट्राली भर लाकडांचा साठा शालेय विद्यार्थी कडून मोलमजुरी करणाऱ्या कामगारा प्रमाणे शाळेच्या स्वयंपाकघरा प्रयत्न लाकडे वहातूक करून घेतली आहे.ही बाब अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांना श्रमिक बाल बनवणाऱ्या शालेय व्यवस्थापनासह कमेटिवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. एकीकडे सुंदर माझी शाळा पुरस्कार देणारे शिक्षण अधिकारी जिल्हा प्रशासन कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जबाबदार शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाणार का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पालक आणि नागरिकांकडून केली जात आहे.
विद्यार्थीचे भविष काय
शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर, पण येथे विद्यार्थ्यांना ज्ञान अर्जना ऐवजी बाल मजुरी करावी लागत असेल तर हे शिक्षणाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासणारे आहे. हा प्रकार बालहक्क आणि शिक्षण हक्क कायद्याचे थेट उल्लंघन करणारा असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती, शालेय पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारलेली व्यक्तींवर जबाबदार कडक कारवाई करणार का? असे अनेक प्रश्न द्यार्थ्यांनी शाळेत शिकायचं की बाल मजुरी करायची? असा संतप्त सवाल पालक आणि स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. याकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे पालक वर्गातून बोलले जात आहे