महाराष्ट्र

अमरापुर जि.प.शाळेत जागतिक महिला दिन व बाल आनंद मेळावा साजरा

मधुकर केदार अहिल्यानगर ( अहमदनगर )अमरापुर ता.शेवगाव येथील जि.प.प्रा.शाळा मराठी व उर्दू येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्या सोबतच बाल आनंद मेळावा घेण्यात आला त्यावेळी शाळेतील बाल गोपालांनी विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल लावून कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अमरापुर ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच सौ,आशाताई बाबासाहेब गरड यांनी भूषवले.कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत अमरापुर चे ग्राम विकासअधिकारी गोरे भाऊसाहेब, आव्हाणे केंद्र प्रमुख रघुनाथ लबडे साहेब,मराठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप गरड ,उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इरफान दातरंगे,उपाध्यक्ष समीर शेख सोसायटी चेयरमन बाळासाहेब पोटफोडे, व्हा-चेयरमन हाजी अजिजभाई पठाण,ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामपंचायत सदस्य ,महिला बचत गट अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सदस्या,माता पालक भगिनी,डॉ.गीतांजली सातपुते,बाफना मॅडम यांसह अमरापुर जि.प.शाळा मराठी मुख्याध्यापक घुमरे सर, उर्दू मुख्याध्यापक सय्यद सर व सर्व शिक्षक शिक्षिका व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक महिला दिन व बाल आनंद मेळाव्या निमित्त सरपंच यांनी विद्यार्थी व माता पालक यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व बचत गटातील महिलांना गृहोपयोगी वस्तु चे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Message Us on WhatsApp