आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बिडकीन वरद हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी
डॉ.सुरेश जंगले व डॉ.जागृती जंगले यांच्या हस्ते अन्नदान वाटप

छत्रपती संभाजी नगर.बिडकीन येथील वरद हॉस्पिटल डॉ. सुरेश जंगले व डॉ.जागृती जंगले मॅडम बिडकीन यांच्या सौजन्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डोणगाव येथे आरोग्य तपासणी व मोफत मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले शनिवार ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तांबे डोणगाव येथे वरद हॉस्पिटल अँड आय.सी.यु बिडकिन तर्फे महिलांकरिता व शालेय विद्यार्थ्याकरिता सर्व रोगनिदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात १०० हून अधिक महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी वरद हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.सौ.जागृती सुरेश जंगले यांनी विद्यार्थ्यांना व महिलांना मार्गदर्शन केले तसेच उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक इतर कर्मचारी व वरद हॉस्पिटल & आय.सी.यु बिडकिन सर्व डाॅक्टर टिम कर्मचारी वर्ग उपस्थित होते महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर येथील समतानगर शनि मंदिर देवस्थान या ठिकाणी गरजू व गरीबांना अन्नदान वाटप करण्यात आले.डॉ जंगले यांच्या मानव सेवेच्या कार्याची सर्वत्र चर्चा होत असून वेळोवेळी त्यांचे सर्व सामान्य जनतेला मदतिचा हात असतो.