पाडळी येथे जिल्हा परिषद शाळेत स्नेह सम्मेलन संपन्न
कार्यक्रमाचे उद्घाटन बिडकीन पोलीस स्टेशनचे ए.पी.आय मा. निलेश शेळके यांच्या हस्ते झाले

पैठण तालुक्यातील पाडळी येथे चिमुकल्यांच्या कौतुकासाठी कौशिक्षणाधिकारी पोहोचल्या दुर्गम भागातील शाळेवर पाडळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीम नगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न. या कार्यक्रमाचे उद्घाटक बिडकीन पोलीस स्टेशनचे ए.पी.आय मा. निलेश शेळके, मार्गदर्शक मा. आमदार विलास भुमरे, अध्यक्ष मा.पाचोड सरपंच शिवराज भुमरे, विशेष उपस्थिती मा. केदार, गटशिक्षणाधिकारी पैठण माननीय जयश्री चव्हाण मॅडम,शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग छत्रपती संभाजी नगर त्याचबरोबर पाडळी ग्रामपंचायत सरपंच लिलाबाई मांगीलाल पवार, उपसरपंच दत्ताभाऊ बांडे, उपसरपंच चंद्रकांत भैय्या, माजी उपसरपंच नामदेवराव चव्हाण, नामदेवराव राठोड, नगरसेवक प्रदीप दादा गायकवाड, पुष्पाताई गायकवाड, संदीप भैया हुड, काकासाहेब टेके मा. केंद्रप्रमुख सुदामजी चंद्र टिके त्याचबरोबर अमोल राजे एरंडे चेअरमन शिक्षक सहकारी पतसंस्था माननीय कैलास मिसाळ सचिव एकनाथ पतसंस्था माननीय जी लबडे राज्य प्रसिद्धीप्रमुख शिक्षक सेना यांची उपस्थिती होती मार्गदर्शन तर भाषणामध्ये माननीय शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण मॅडम यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गुणवत्ता आणि दर्जा टिकून असल्याने आपण सगळ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला सहकार्य करावे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन तत्पर आहे अशा पद्धतीची ग्वाही देउन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपन्न करण्यात आला. स्नेह सम्मेलन कार्यक्रमाचे व्यवस्थापन मा. गायकवाड सर,व घोलप सर यांनी केले.