महाराष्ट्र ग्रामीण
ऑनलाइन चक्री जुगारावर अड्ड्यावर कारवाई
लाख ३८ हजार ८५० रुपयांचा असा मुद्देमाल जप्त

पैठण तालुक्यातील चितेगाव येथे ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर बिडकीन पोलिसांची कारवाई केली असून. या कारवाईत पोलिसांनी तीन ऑनलाईन चक्री चालक जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून बिडकीन पोलिसांनी ऑनलाईन जुगाराचे साहित्या सह, रोख रक्कम एकूण १ लाख ३८ हजार ८५० रुपयांचा असा मुद्देमाल जप्त केला आहे. किशोर शाम जावळे, रा चितेगाव, इब्रान इरफान कुरेशी, रा चंपा चौक, पिवळी कॉलनी रोशन गेट, प्रवीण बबन पटेकर, रा. रमानगर, चितेगाव येथील असून त्याच्यावर बिडकीन पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.