अपरिचित इतिहास

New Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीत भयंकर प्रकार, चोरांनी गर्दीत चाकू-ब्लेड फिरवले अन् अनर्थाला झाला प्रारंभ

New Delhi Railway Station Stampede: दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर (New Delhi Railway Station Stampede) झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घटली.

दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आले होते. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर काल रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.

रेल्वे स्थानकावर अचानक प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे लोक एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर धावले. तसेच मोठ्या संख्येने लोकांकडे जनरल तिकिटे होती.

दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीदरम्यान भयंकर प्रकार देखील आता समोर आला आहे.
चेंगराचेंगरी दरम्यान चोरट्यांनी देखील हात साफ करुन घेता. चोरांनी लोकांचे खिशे कापण्यासाठी गर्दीत चाकू अन् ब्लेड फिरवले. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आणि रक्तस्त्राव झाला, ज्यामुळे अधिक चेंगराचेंगरी झाली.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पोलिस उपायुक्त (रेल्वे) यांनी सांगितले की, जेव्हा प्रयागराज एक्सप्रेस ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उभी होती, तेव्हा तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या आणि या गाड्यांमधील प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 12, 13 आणि 14 वर देखील उपस्थित होते.
रेल्वे दर तासाला 1500 जनरल तिकिटे विकत होती, त्यामुळे स्टेशनवर गर्दी वाढली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली.
प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाल्यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 दरम्यान एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button