Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायलं, वाल्मिक कराडचं नाव घेत म्हणाला…

Maharashtra Politics: भाजपच्या भरत जाधव या नगरसेवकाने पोलीस अधिकाऱ्यांसमोर विष प्यायले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकं काय घडलं?
नवी मुंबई: नवी मुंबईतील जिल्ह्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विषप्राशन केले. भरत जाधव असे या नगरसेवकाचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील (Raigad News) कर्जत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी विष पिण्याच्या आधी आपली फसवणूक झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्येसारखे (Suicide News) टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही. विष प्यायल्यानंतर भरत जाधव यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र, ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.